Wednesday, December 13, 2017

पराधीनतेला उपाय

 🌹🌷🌹*" नामप्रेमचिंतन "* 🌹🌷🌹
*शंका*- जेव्हा पराधिनता येते (मनुष्याचा कुठलाच इलाज चालत नाही अशा प्रसंगांमध्ये ) कर्माच्या बाबतीत स्वस्थ बसून राहायचे का? आपण काहीच करू शकत नाही असा विचार मनात येतो तेव्हा काय करावे?

*श्रीराम!* एखाद्यासाठी काही करता येत नाही म्हणून मग 'तुका म्हणे उगी राहावे जे जे होईल ते ते पाहावे' या भावनेने बसून राहावे का? तर नाही. किंकर्तव्यमुुढ किंवा कसं वागावं हे कळत नसेल तेंव्हा अशा परिस्थितीत माझ्या सद्गुरूंनी किंवा रामरायानें कसं आचरण केलं असतं याचं नामांत राहून चिंतन करावं, उत्तर मिळेल! गृहात राहणारा गृहस्थ; तर स्वमध्ये राहणारा स्वस्थ!
गृहे तिष्ठति इति गृहस्थः।
स्वस्मिन तिष्ठति इति स्वस्थः।
तुका म्हणे उगी रहावे : स्वस्थभाव!
जे जे होईल ते ते पहावे : स्थायीभाव!
स्वस्थ राहणे म्हणजे हातावर हात धरून निष्क्रिय राहणें नाही तर 'स्व'चे भान ठेवून विवेकाने कर्म करणें!
'तुका म्हणे उगी रहावे' यात 'स्व'च्या स्मरणांत कर्तव्य करावें; तर कर्तव्य पूर्ण केल्यावर फळ आपल्या स्वाधिन नसल्यानें कर्तव्यानंतर 'जे जे होईल ते ते पहावे'! या एकाच ओळीत संपूर्ण भगवद्गितेचं सार आहे! कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।।
'राम कर्ता' याचा अर्थ आपण कर्म करायचं नाही असा नसून रामाकडे कर्तेपण देऊन आपण त्याच्या सत्तेनं कर्म करायचं! उदाहरणार्थ भरतानें केलेलं राज्य! रामाकडे कर्तेपण देऊन म्हणजे रामाच्या स्मरणांत कर्म करायचें. म्हणजे 'हातानें काम आणि मुखानें नाम' सांभाळायचं! तेंव्हा, "तुका म्हणे उगी रहावे" याचा अर्थ "हातानें काम, मुखानें नाम"! आणि 'जे जे होईल ते ते पहावे' म्हणजे "रामेच्छा"!
*("नामप्रेम" पुस्तकातून साभार)*
🙏 *जानकी जीवन स्मरण जय जय राम* 🙏

No comments:

Post a Comment