Wednesday, December 13, 2017

श्वासावर नाम

 🌹🌷🌹 *" नामप्रेमचिंतन "* 🌹🌷🌹
*शंका*- श्र्वासा बरोबर जप केला तर एक तासाला ९०० असा होतो आणि २४ तासाचा जप २१६०० इतका होतो ...नामजप माळेवर केला तर श्र्वासापेक्षा जास्त कसा होतो ? कृपया मार्गदर्शन करावे!!

*श्रीराम!* श्वासावर नाम ही मध्यावस्था आहे, असं मला वाटतं. नामसाधकाच्या प्राथमिक अवस्थेत श्वासाच्या गतीपेक्षा नामजपाची गती कमी आहे की जास्त यापेक्षा नाम घेतांना नामीचं स्मरण महत्वाचं आहे!
नाम घेतांना नामीचं स्मरण होऊ लागलं की पुढे तो साधक श्वासावर नाम घेऊ लागतो. यांत जेवढे श्वास तेवढीच जपसंख्या असू शकते. तसेच या अवस्थेत हाेणारं नामस्मरण हे संख्यात्मक नामापेक्षा दर्जात्मक नामस्मरण असतं!
मुळात एका तासांत संख्या कमी तर दर्जा उच्च असतोच असं नाही, तसेंच एका तासांत संख्या फार जास्त असेल तर त्यात दर्जा उच्च नसतो, असंही नाही! आवर्तन प्रकार आपण बघितला तर लक्षात येईल की एखादा "पोचलेला" साधक एका तासांत १०,००० नामजप करू शकतो!
आपण सर्वजण नामसाधनेच्या पुर्वप्राथमिक किंवा फार तर प्राथमिक पायरीवर असल्यानें आपण एका तासांतील संख्यात्मक नामापेक्षा दर्जात्मक नामस्मरणाकडे लक्ष द्यावं! गती अती वाढवण्याच्या भानगडीत पडू नयें!
तर, श्वासासंबंधी नामस्मरणाच्या तीन अवस्था असू शकतात:
१) श्वासाप्रमाणें नामाची आवश्यकता मानून शक्य तितकं नाम घेणें, ही पहिली अवस्था!
२) श्वासावर नाम घेणें ही मध्यावस्था!
आणि यापलिकडची सर्वोच्च अवस्था म्हणजे
३) श्वासावर नाम नाही तर, नामावर श्वास चालणे!
या कळसावर पोचण्यासाठी अगोदर नामाला शक्य तितकं चिकटण्याचा प्रयत्न करूया!
*("नामप्रेम" पुस्तकातून साभार)*
🙏 *जानकी जीवन स्मरण जय जय राम* 🙏

No comments:

Post a Comment