Wednesday, December 13, 2017

कौतुक व कोडकौतुक यात फरक काय ?

 🌹🌷🌹*" नामप्रेमचिंतन "* 🌹🌷🌹
*शंका*- कौतुक व कोडकौतुक यात फरक काय ?

*श्रीराम!* कौतुक हे वाचिक असते, तर कोडकौतुक हे वाचिक, मानसिक आणि कायिक असते.
एखाद्या भक्तानें *'माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव'* किंवा *'माझी रामाबाई निराकार'* असं म्हणणं हे भगवंताचं केलेलं कौतुक!
आणि
*मज सर्वस्वी पाळीलें। प्रतिदिनीं सांभाळिलें।।*
हे भगवंतानें केलेलं भक्ताचं कोडकौतुक!
आपण महाराजांना आपलं मानून नाम घेणं म्हणजे आपण केलेलं भगवंताचं कौतुक!
आणि
महाराजांनी आपल्याला त्यांचं मूल मानून आपल्याला सर्व परिस्थितीत समाधान देणं हे त्यांनी केलेलं कोडकौतुक!
कौतुकांत कदाचित थोडा कोरडेपणा असू शकतो, परंतु कोडकौतुकांत प्रेमाचा ओलावा असतो!
*'गुरूराव माझें रामचि केवळ।'* हे पु. ब्रम्हानंद महाराजांनी केलेलं कौतुक!
आणि
त्याच ब्रम्हानंद महाराजांनी *'महाराजांनी मला अगदी आपल्यासारखं केलं!'* असं म्हणणं हे श्रीमहाराजांनी केलेल्या कोडकौतुकाची अनुभुती!
*("नामप्रेम" पुस्तकातून साभार)*
🙏 *जानकी जीवन स्मरण जय जय राम* 🙏

No comments:

Post a Comment