शंका :- नामध्यान आणि नामसमाधी हे दोन शब्द आज वाचनात आले. अर्थ जाणून घेण्याची इच्छा आहे.

*श्रीराम!*
पातंजल योगामध्यें समाधीसुख अनुभवायचं असेल तर सप्तसोपान सांगितले आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी!
योगमार्ग, कर्ममार्ग, ज्ञानमार्ग आणि भक्तीमार्ग असे हिंदू अध्यात्मचौकातून निघणारे चार रस्ते आहेत. चार पैकी कोणताही एक मार्ग स्विकारला तरी परमात्मदर्शन होईल, असं हे शास्त्र सांगतं!
परंतु, महाराष्ट्रातील संतमंडळींनी हे चार स्वतंत्र मार्ग न मानता त्यांचा एकत्रित पण सुलभ मार्ग दाखवला.
परंतु, महाराष्ट्रातील संतमंडळींनी हे चार स्वतंत्र मार्ग न मानता त्यांचा एकत्रित पण सुलभ मार्ग दाखवला.
सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य महाराजांनी तर चारही मार्गांचा सुरेख संगम साधलेला दिसेल. आणि या संगमाचा केंद्रबिंदू नाम!
नामांत राहून कर्तव्य केले तर कर्ममार्ग साधेल; नामावर दृढ निष्ठा ठेवली तर नाम हाच राम ही जाणीव होऊन ज्ञानमार्ग साधेल; नाम हा सद्गुरूंचा प्राण मानून नामाचीच संगत धरली तर भक्तीमार्ग साधेल! आणि योगमार्ग याला अपवाद नाही! आपण योगमार्गातील सात पायऱ्या चढून आठवी समाधी अवस्थेची पायरी कशी गाठावी, याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे श्रीमहाराजांचं चरित्र!

आता आपण हा अष्टांगयोग बघणार नसून यापैकी वर विचारल्याप्रमाणें शेवटच्या दोन योगांना स्पर्श करूया!
नामध्यान: नाम ही भगवंताची स्पंदनशील प्रतिमा आहे. या प्रतिमेवर मन एकाग्र करणें म्हणजेच नामध्यान!
नामध्यान: नाम ही भगवंताची स्पंदनशील प्रतिमा आहे. या प्रतिमेवर मन एकाग्र करणें म्हणजेच नामध्यान!
ध्यानामध्यें मनावर सर्व उपचार होतात. मनाचा विषयाकडचा सर्व ओढा बंद करून निर्विषय भगवंताकडे लावला की ध्यान लागलं, असं म्हणतात. आणि या ध्यानासाठी नामासारखा मार्ग नाही. कारण, मनाचं कामाकडे होणारं मार्गक्रमण रामाकडे लावायला नामाचीच मदत होते. आजच्या विषयी, विकारी 'मना'च्या उलट'नाम' आहे. तेंव्हा, मनाचें ध्यानकेंद्र नाम म्हणजे नामध्यान!
आता, नामसमाधी! नामध्यान सतत होऊ लागलं की त्याचंच पर्यवसान नामसमाधी मध्ये होतं! समाधी ही सहजावस्था असेल तर तिचं विशेष महत्व आहे. ही समाधी सहज लागण्यासाठी अखंड नामध्यान जरूर आहे!
*अखंड ध्यानाचें लक्षण। अखंड देवाचें स्मरण ।*
*याचे कळता विवरण । सहजचि घडे ।।*
*अखंड ध्यानाचें लक्षण। अखंड देवाचें स्मरण ।*
*याचे कळता विवरण । सहजचि घडे ।।*
ध्यानामध्यें एकानें एकाचंच चिंतन करावं हे जरूर आहे. याचा अर्थ ध्यानामध्यें प्रवेश झाला त्यावेळी ध्यानी आणि ध्याता असा द्वैतभाव असतो. परंतु, हेच ध्यान म्हणजे चिंतन जेंव्हा सतत होऊ लागतं तेंव्हा ध्यानी साधक व ध्याता भगवंत हा द्वैतभाव जाऊन ध्यानी ध्यात्याशी एकरूप होऊन जातो.
*चिंतने चिंतने तद्रुपता ।*
या तद्रुप अवस्थेलाच समाधीवस्था म्हणतात! ध्यानावस्थेत जे नाम आहे, तेच नाम समाधीवस्थेत देखील असते. परंतु, ध्यानावस्थेतील नामधारक समाधीवस्थेत गेल्यावर नामीमध्यें लय पावतो. या अद्वैतावस्थेत नामधारक, नामी (भगवंत) आणि नाम ही त्रिपुटी समाप्त होऊन एकच गोष्ट उरते, ती म्हणजे नाम! ही खरी नामसमाधी!

*("नामप्रेम" पुस्तकातून साभार)*

No comments:
Post a Comment