🌸🌹🌸 ।। नामसंध्या ।। 🌸🌹🌸
श्रीराम!
भगवंताने ही सृष्टी निर्माण केलेली असल्याने याठिकाणी येणाऱ्या जीवात त्याचा अंश असतोच असतो. परंतु, अहंपणामुळे मनुष्य मी अंशीचा म्हणजे भगवंताचा अंश आहे हे विसरून अनाचार करतो. अहंपणामुळे जगतसंबंध दृढ होऊन मनुष्य बंधनात अडकत जातो. पण अहंकृतीला दंडित करून जो भगवद्संबंध दृढ करतो, तो मोक्षाकडे वाटचाल करतो.
हे जसे सामान्य मनुष्याचे आहे, तसेच मनुष्याला निर्माण करणाऱ्याला भगवंताचें आहे. अनन्यता पूर्वक समर्पण असेल तर भगवंत त्या समर्पित भावासाठी स्वतः जीवरूपाने जगतबंधनात येतो. माझं "प्रत्येक" कर्म, विचार, भाव जर भगवंताला समर्पित होत असतील, तर ते कर्म, विचार, भाव या ना त्या रूपात भगवंत स्विकारण्यासाठी हजर असतो. आणि भगवंतांचे असे प्रागट्य म्हणजे भक्तासाठी जिवंतपणी मुक्ती! यातून बोध घेऊन आपल्या सद्गुरूंना विनवणी करावी की,
अनन्यता मज घडो स्वानंद रूपी ।।
🌹।।जानकी जीवन स्मरण जय जय राम।।🌹
No comments:
Post a Comment