Wednesday, May 2, 2018

नामसाधना


🌹🌷  ।। नामसंध्या ।। 🌹🌷



श्रीराम! 
आपण ज्या संप्रदायात आहोत त्या संप्रदायाचा प्राण म्हणजे नामसाधना! नामसाधनेत उत्तीर्ण होण्यासाठी नाम आणि साधना दोन्ही जपले पाहिजे. एकीकडे मनाला नामाने उन्मन करत असतांना दुसऱ्या बाजूने देहाला साधनेने पवित्र करणे म्हणजे नाम साधना. आजच्या युगात मनावर नामाचे अखंड संस्कार करणे जेवढे जरूर आहे तेवढेच देहावर साधनेचे संस्कार अनिवार्य आहेत.

देहाचे चोचले पुरवून आपण नामसाधनेत बाधक गोष्टी आणतो. देहाने कुठे जावे, देहाने काय खावे, किती खावे, देहाने काय बघावे, काय वाचावे, काय बोलावे, किती बोलावे यावर जोपर्यंत अंकुश ठेवल्या जात नाही, तोपर्यंत ज्या देहाच्या माध्यमातून आपण नाम घेत आहोत, तोच देह साधनेत अडसर ठरत राहतो. तेंव्हा, नामजप ही साधना होण्यासाठी देहाला त्यासाठी साधक बनवणे अनिवार्य आहे, याचे साधकाने भान ठेवले पाहिजे!

🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

No comments:

Post a Comment