🌹
🌷
" नामप्रेमचिंतन "
🌹
🌷
शंका : दास्यभक्तीवर चिंतन मांडावं.
➡






श्रीराम! भगवद्प्रेम आणि आत्मज्ञान प्रगट होण्यासाठी भगवंताच्या दिशेने केलेली भावपूर्ण वाटचाल म्हणजे भक्ती! या नवविध वाटचालीतील क्रियात्मक आणि संबंधात्मक भक्ती म्हणजे'दास्यभक्ती'! यामध्यें सेवा ही क्रिया आणि भगवंताचें दास्यत्व हा संबंध आहे!
ज्यांच्या नावातच रामसेवा व्यक्त होते, असे समर्थ "रामदास" स्वामी म्हणजे दास्यभक्तीचं मूर्तीमंत उदाहरण! नवविधा भक्तींपैकी सर्वांत खडतर आणि अनन्यतेची पराकाष्ठा बघणारी भक्ती म्हणजे'दास्यभक्ती' असेल.
ही दास्यभक्ती कशी करावी, हे समर्थच समर्थपणें सांगू शकतात. ग्रंथराज दासबोधात केवळ दास्यभक्ती समासातच नाही तर पदोपदी समर्थांनी रामदास कसं होता येईल, हे स्वानुभवातून मांडलं आहे. तेंव्हा, दास्यभक्तीची पद्धती यावर मी बोलणार नाही. परंतु, या भक्तीची पार्श्वभुमी आणि त्यातून मला झालेला अल्पसा बोध मांडेन.
या भक्तीचं फळ काय आहे तर दासाच्या मागेपुढे समर्थ स्वामी सतत राहतो. म्हणून आपण रामदासच्या अगोदर समर्थ आणि नंतर स्वामी लावून "समर्थ रामदास स्वामी" असं म्हणतो! दास्यभक्ती च्या महात्म्याचं यापेक्षा दुसरं कोणतं वर्णन होऊ शकतं?
दास्यभक्तीचा अनुभव सांगतांना समर्थ म्हणतात,
रामदास्य करुनि पाहे । सर्व सृष्टी चालताहे ।
प्राणिमात्र रामदास । रामदासीं हा विश्वास ।।
रामदास्य करुनि पाहे । सर्व सृष्टी चालताहे ।
प्राणिमात्र रामदास । रामदासीं हा विश्वास ।।
'दास' हा शब्द व्यवहारात गुलामगिरीच्या अर्थानें कमीपणाचा वाटतो. परंतु, अध्यात्मजगात भगवंताचा दास हा दरिद्री गुलाम नसून जगातील सर्वांत मोठ्या संपत्ताचा मालक मानला जातो. ही संपत्ती कोणती? तर
दासाची संपत्ती राम सीतापती ।
जीवाचा सांगाती राम एक ।।
दासाची संपत्ती राम सीतापती ।
जीवाचा सांगाती राम एक ।।
मला वाटतं, रामदास होण्यासाठी अगोदर रामध्यास जरूर आहे!
आपण ज्याच्या अधीन होतो, त्याचा आपल्याला ध्यास लागतो. आणि ज्याचा आपल्याला ध्यास लागतो, त्याचे आपण दास बनतो! आज आपण विषयाधीन झालेलो आहोत. त्यामुळे आपल्याला सतत धन, सुत, दाराचाच ध्यास लागतो. म्हणजेच आपण या विषयाचे दास झालेलो आहोत. म्हणून समर्थांनी एक महत्त्वाचा संकेत केला की,
जोपर्यन्त विषयाची आस । तोपर्यन्त नव्हे भगवंताचे दास ॥
तेंव्हा, ज्यांना 'राम' हवा त्यांनी काम जाळावा.
जोपर्यन्त विषयाची आस । तोपर्यन्त नव्हे भगवंताचे दास ॥
तेंव्हा, ज्यांना 'राम' हवा त्यांनी काम जाळावा.
याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे भगवान शंकर!
जेणे जाळीला काम तो राम ध्यातो ।।
काम जाळल्याशिवाय 'राम' ध्याता येत नाही. आणि रामाचा ध्यास लागत नाही, तोपर्यंत रामदास होता येत नाही! म्हणून, सोडी संसाराची आस । धरी भक्तीचा हव्यास ।
यांत भगवंताचे दास्यत्व स्विकारण्यासाठी संसार सोडायचा नसून आस सोडायची आहे. जो दास असतो त्याला कसलीही आस नसते.
जेणे जाळीला काम तो राम ध्यातो ।।
काम जाळल्याशिवाय 'राम' ध्याता येत नाही. आणि रामाचा ध्यास लागत नाही, तोपर्यंत रामदास होता येत नाही! म्हणून, सोडी संसाराची आस । धरी भक्तीचा हव्यास ।
यांत भगवंताचे दास्यत्व स्विकारण्यासाठी संसार सोडायचा नसून आस सोडायची आहे. जो दास असतो त्याला कसलीही आस नसते.
त्रिभुवनातील पहिला रामदास म्हणजे शिवभगवान! त्याच साक्षात् शंकराचा अवतार मारुती! दास्यत्वाची परिसीमा म्हणजे हनुमंत! रामरायाच्या चरित्रात हनुमंताचा उल्लेख केला नाही तर रामचरित्र पूर्णत्वाला जाणार नाही. श्रीराम भरताला म्हंटले, या दासानें जी सेवा केली त्यातून ऋणमुक्त होणे केवळ अशक्य आहे. कारण अतुलनीय अशी "निष्काम" सेवा करूनही त्याच्यात अहंकाराचा लवलेश नाही! हनुमंत स्वतःला रामाचा दास म्हणवत असले तरी रामराया त्याला म्हणतात, मला भरत प्राणांहून प्रिय आहे. आणि तुम मम प्रिय भरतसम भाई ।।दास्यभक्तीची ही सर्वांत मोठी पावती आहे की आपल्या स्वामीचं आपल्यावर उत्कट प्रेम असावं!
शंकराचा अवतार असलेला मारुती कलियुगी रामदासाची मूर्ती म्हणून आले. आणि पुन्हा एकदा रामदास्यत्व आचरून दाखवलं. या रामदास्यत्वापोटीच शिवभगवंताने सतीचा त्याग केला; हनुमंत अवतारात स्वेच्छेचा त्याग केला; तर समर्थ अवतारात लौकिक प्रपंचाचा त्याग केला. ही दास्यभक्तीची दिव्य आदर्शपद्धती आहे.
परंतु, माझ्यासारख्या संसारात, प्रपंचात, लौकिकात राहणाऱ्या माणसाला दास्यभक्तीचा आदर्श जर कुणी असेल तर तो म्हणजे भरत!
१४ वर्ष लक्ष्मणानें सीतारामाची अविरत सेवा केली. भरतानें श्रीरामपादुका घेऊन रामराज्य सुरू केले. त्यानंतर, चित्रकुटावर असतांना एके रात्री (पहारा म्हणून) आश्रमाला प्रदक्षिणा घालताना लक्ष्मणाने पाहिले की राघव जागेच आहेत. तेंव्हा लक्ष्मणाला अस्वस्थ वाटून त्याने श्रीरामाजवळ जाऊन कारण विचारले.
मुळात धीरगंभीर असलेले पण आता डोळे डबडबलेले राघव म्हंटले, "मला कैकयीनंदन भरताची फार आठवण येतीये. त्याच्या शील आणि सेवाभावाला तोड नाही." संसारातील सर्वोच्च सुखसुविधा, ऐश्वर्य व राजसत्तेत राहून देखील सोडी संसाराची आस । धरी भक्तीचा हव्यास । अशी दास्यभक्ती करणारा अद्वितीय रामदास म्हणजे भरत!
स्वामीसाठी दासाच्या डोळ्यात पाणी येणं ही उच्चकोटीची भक्ती आहे. परंतु, आपल्या दासाची सेवावृत्ती पाहून स्वामीचे डोळे पाणावणं ही अत्युच्चकोटीची दास्यभक्ती आहे, असं वाटतं!
मुळात धीरगंभीर असलेले पण आता डोळे डबडबलेले राघव म्हंटले, "मला कैकयीनंदन भरताची फार आठवण येतीये. त्याच्या शील आणि सेवाभावाला तोड नाही." संसारातील सर्वोच्च सुखसुविधा, ऐश्वर्य व राजसत्तेत राहून देखील सोडी संसाराची आस । धरी भक्तीचा हव्यास । अशी दास्यभक्ती करणारा अद्वितीय रामदास म्हणजे भरत!
स्वामीसाठी दासाच्या डोळ्यात पाणी येणं ही उच्चकोटीची भक्ती आहे. परंतु, आपल्या दासाची सेवावृत्ती पाहून स्वामीचे डोळे पाणावणं ही अत्युच्चकोटीची दास्यभक्ती आहे, असं वाटतं!
आज कलियुगात आपण प्रपंच न सोडता रामदास कसं व्हावं, याचं आचरण त्रेतायुगात या महात्मा भरताने दाखवून दिलं. संसार तोच, प्रपंच तोच,व्यवहार तोच; परंतु रामरायाची सत्ता मानून आपण सेवकभावनेनें जर जगलो, तर हाच प्रपंच रामरायाची सेवा ठरेल!
दास्यभक्तीची कमाल अशी आहे की, जेंव्हा एखादा भक्त आपल्या दास्यभक्तीची परिसीमा ओलांडतो,तेंव्हा दास दास न राहता स्वामी स्वतःच दासाचं दास्यत्व स्विकारतो!
दास्य करी दासाचे । उणे न साहे तयाचे ।।
भगवंत भक्ताची दास्यभक्ती पाहून न राहवून म्हणतो, I am at your service!
दास्य करी दासाचे । उणे न साहे तयाचे ।।
भगवंत भक्ताची दास्यभक्ती पाहून न राहवून म्हणतो, I am at your service!
खांदे पाणी वाहिले, दळण कांडण सारीले ।
हाकेसरशी धावुनी आले, भक्ताचिया ।।
हाकेसरशी धावुनी आले, भक्ताचिया ।।
भक्तानें आपला प्रपंच, कर्तव्य सांभाळून नुसतं स्मरण ठेवलं तरी भगवंत स्वतः
गोरा कुंभाराच्या संगे ।
चिखल तुडवूं लागे अंगे ।
कबिराच्या बैसोनि पाठी ।
शेले विणता सांगे गोष्टी ।
चोखामेळ्यासाठी ।
ढोरे हाकी जगजेठी ।
जनीसंगे दळू लागे ।
सुरवर म्हणती धन्य भाग्ये ।।
गोरा कुंभाराच्या संगे ।
चिखल तुडवूं लागे अंगे ।
कबिराच्या बैसोनि पाठी ।
शेले विणता सांगे गोष्टी ।
चोखामेळ्यासाठी ।
ढोरे हाकी जगजेठी ।
जनीसंगे दळू लागे ।
सुरवर म्हणती धन्य भाग्ये ।।
समर्थांचा अज्ञान नावाच्या शिष्यानें सीतामाईला स्वयंपाक करायला लावला, हनुमंताला सरपण आणायला पाठवला, लक्ष्मणाला झाडलोट करायला लावली; तर रामरायाला स्वतः स्वतःला काकडारती ओवाळून घे म्हणून सांगितलं! हा अधिकार, हे प्रेम,हा दास्यभाव येण्यासाठी अगोदर भक्ताला झिजावं लागतं, स्वतःतील रामदास्यत्व सिद्ध करावं लागतं!
आणि ही 'रामदास' पदवी प्राप्त करण्यासाठी आपली कर्तव्यं तर करावीच, परंतु त्यात भगवंताचें अखंड स्मरण राखावें. यासाठी समर्थ म्हणतात,
जो जो भजनासी लागला ।
आणि ही 'रामदास' पदवी प्राप्त करण्यासाठी आपली कर्तव्यं तर करावीच, परंतु त्यात भगवंताचें अखंड स्मरण राखावें. यासाठी समर्थ म्हणतात,
जो जो भजनासी लागला ।
तो तो रामदास झाला ।।
आज मनुष्य विषयात आसक्त असल्यामुळे त्याच्यातील ‘मीपणा’ दृढ असल्यामुळे तो परिस्थितीवर स्वामित्व गाजवण्याचा असफल प्रयत्न करत आहे. असा मनुष्य दास होऊ शकत नाही. तो म्हणतो, मी मालक आहे. ‘दास नव्हे मी’ असा अहंकृतीचा ‘मी’ रामचरणी लीन झाल्यावर एक नवीन आणि सात्विक शरणागत ‘मी’ उरतो. हा नवा ‘मी’ दास्यभावाने युक्त असल्याने त्याला ‘दास नव मी’ असे म्हणता येईल.
तेंव्हा, ‘दास नव्हे मी’ ते ‘दास नव मी’ अशी यात्रा घडण्यासाठी दासनवमीच्या पुण्यपर्वकाळात हे रामदास्यत्व आपण तनमनाने स्वीकारुया. या यत्नातून आपल्या सर्वांना रामप्रेमाची संपत्ती अनुभवायला मिळावी, ही समर्थचरणी विनम्र प्रार्थना!!!
("नामप्रेम" पुस्तकातून साभार)


अप्रतिम विचार मांडलेत सर,आयुष्यभर लक्षात ठेवण्याजोगे वाक्य आहे " रामदास होण्यासाठी अगोदर रामध्यास जरूरी आहे. " आणि रामध्यासासाठी समर्थांनी सांगितल्याप्रमाणे सतत नामस्मरण आवश्यक आहे
ReplyDeleteश्रीराम! सतत सावधानतेने आचरण आणि तन्मयतेने नामस्मरण ही प्रपंच आणि परमार्थ कल्याणाचा करण्याची बैठक आहे!
Delete