Wednesday, February 20, 2019

पू. आनंदसागर महाराज पुण्यतिथी पर्वकाळ चिंतन


🌹🌷" नामप्रेमचिंतन " 🌹🌷

शंका- आज श्री .प पु . आनंदसागर यांची पुण्यतिथी महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!! कृपया यावर थोडं चिंतन मांडावं!


श्रीराम! 
🌺 आनंदाचा सागर नयनी पहा रे गड्यांनो! 🌺

श्रीराम! आजचा दिवस आनंदाचा आहे! त्यावर चिंतन करणे जरूर वाटते. आमच्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात मठ पिंपळगांव येथें १९व्या शतकांत एका कुलकर्णी कुटुंबात अनंतराव यांना एक दिव्य पुत्ररत्न प्राप्त झालं. नाव ठेवण्यात आलं, गोविंद! या गोविंदाला बालपणीच वडिलांमुळे दासबोधाची अत्यंत गोडी लागली. ६-७ वर्षाचा गोविंदा वडील दासबोध वाचू लागलें की कानाचे प्राण करून ऐकायचा. परंतु, वयाच्या आठव्या वर्षी मौंज झाल्यानंतर दोनच वर्षांत गोविंदाचं पितृछत्र हरवलं. भाऊबंधांनी सगळी संपत्ति लुबाडल्यावर इंदौरला येऊन गोविंद स्वतःचं आणि आईचं पोट भरण्यासाठी लहानपणीच थोडं काम करू लागला. प्रापंचिक तापाने पोळलेला गोविंद सतत दासबोधात रमू लागला आणि त्यातून आत्मचिंतन वाढू लागलं.

साधारण पंधरा वर्षाचा झाला असतांना एके दिवशी हा नवतरुण इंदौर येथे दासबोधात आकंठ बुडालेला होता आणि विचार करू लागला की मला या साधनेत सिद्धाचा आशीर्वाद मिळेल का?

आणि त्याचवेळी एक दिव्य महात्मा समोर येऊन हजर! भव्य शरीर, अंगात कफनी, डाव्या हातात कुबडी, उजव्या हातात तुळशीमाळ, कपाळावर केशरी त्रिपुंड. चेहऱ्यावर दया, क्षमा आणि करुणा असलेल्या या श्रीमुखातून आदेश आला, "मला येऊन भेट!"

श्रीमहाराज इंदौरमध्ये ज्याठिकाणी वास्तव्यास होते, तिथें शोधत शोधत गोविंद गेला आणि त्याच महात्म्याला बघून लोटांगण घातलें. परमानंद वाटला. दुसऱ्या दिवशी आपल्या आईला सुद्धा श्रीचरणीं आणले. सतत नामांत राहिल्यास सद्गुरूच तुम्ही असाल तिथें येतील आणि तुम्हाला अनुग्रहीत करतील! याचा प्रत्यय गोविंदाला आला. महाराजांनी गोविंदाला आईसह बडवाह येथे जाऊन साडेतीन कोटी रामनामजप करण्यास सांगितले. आणि गुरूकृपेनें व गोविंदाच्या निष्ठेनें साडेचार वर्षात हा जपसंकल्प पूर्ण झाला.
यादरम्यान श्रीमहाराजांनी या सत्शिष्याला पत्र लिहिले, त्यात गोविंदला नवीन नामभिधान दिले. ते म्हणजे आनंदसागर! चि. गोविंद अनंत कुलकर्णी हा गुरूकृपेनें 'आनंदसागर' बनला!

या प.पु. आनंदसागर महाराजांच्या पुण्यतिथीच्या पर्वकाळांत आपण हे त्यांचं पुण्यस्मरण करत आहोत. काय गंमत आहे बघा, आनंदसागर महाराजांचं नामतेज वाढलेलं बघून त्यांची आईसुद्धां त्यांना नमस्कार करू लागली. यांवर वाद होऊन दोघांनी श्रीमहाराजचरणीं आपलं गाऱ्हाणं मांडलं. श्रीमहाराज म्हंटलें, दोघांनी एकमेकांना नमस्कार करू नका!
शिष्यत्वाची दासबोधात सांगितलेली लक्षणं आनंदसागर महाराजांमध्यें कशी ठासून भरली होती, त्याचा एक छोटासा प्रसंग.... एकदां एकादशीला सकाळच्या वेळी श्रीमहाराज म्हंटलें, "आनंदसागर, तू भजन करत बस. मी जरा जाऊन येतो, मग आपण आरती करुया!" श्रीमहाराज जे बाहेर गेले ते दुसऱ्याच दिवशी आले आणि पाहतात तर यांचं भजन सुरूच! श्रीमहाराज म्हंटलें, 'शिष्य असावा तर असा!' प्रत्यक्ष सद्गुरूंकडून अशी पोचपावती मिळालेलें सत्शिष्य मोजकेच!

पुढे श्रीमहाराजांच्या आज्ञेनें आनंदसागर महाराजांनी १८९३ साली अंबड येथें तर १८९७ साली जालना येथे श्रीराम मंदीराची स्थापना केली. जालना श्रीराम मंदीराची पार्श्वभुमी ऐकण्यासारखी आहे. आनंदसागर महाराज प्रवासांत असतांना जालना येथें १८९७ साली आले होते. त्यावेळी, आजचा जो मंदीराचा आनंदवाडी परिसर आहे, तो निर्जन दाट झाडींचा गावाबाहेरचा परिसर होता. जवळचं रेल्वे स्टेशन सोडलं तर या भागांत दिवसासुद्धां जाणं भितीदायक असें. आनंदसागर महाराज गावांत न उतरता या जंगली भागांत एक लहानसं भैरवनाथाचं मंदीर होतं, तिथें उतरलें. सकाळी स्नान, संध्या, पुजादी कर्म झाल्यावर बुवा गावांत भिक्षेला जात. जाण्यापुर्वी सोबतच्या राम, लक्ष्मण, सीतेच्या लहानशा मुर्त्या भैरवनाथाच्या मुर्तीच्या खालच्या पायरीवर ठेवत....
एके दिवशी त्यांनी पाहिलं की, रामरायाची मुर्ती वरच्या पायरीवर आणि भैरवनाथाची मुर्ती खाली! त्यांना वाटलं आपलं चुकलं असेल. म्हणून त्यांनी मुर्त्या आपापल्या जागेवर ठेवल्या. परंतु, दुसऱ्या दिवशी तोच प्रकार घडला.
मग त्यांनी गोंदवल्याला श्रीमहाराजांना पत्र लिहून सर्व वृत्तांत सांगितला. श्रीमहाराजांचं उत्तर आलं, ही रामेच्छा दिसत आहे. असं करूया त्याठिकाणी श्रीराम मंदीर स्थापनेची तयारी करावी. रामरायाची भव्य मुर्ती घेऊन आम्ही जालन्याला येऊ आणि थाटांत श्रीरामस्थापना करू!
अशाप्रकारे, १८९७ साली रामराया नामावतारी श्रीमहाराजांच्या हस्ते जालना येथे विराजमान झालें.
राघोबा उदारा ये माझ्या मंदीरा ।
जानकीच्या वरा रामराया ।।
आनंदसागर महाराजांनी रामाचा, नामाचा सुरू केलेला हा आनंदोत्सव आजपर्यंत सुरू आहे....

 तर पुढे ब्रम्हानंद महाराजांप्रमाणें आजन्म ब्रम्हचर्य पालन करून रामसेवा करावी, अशी आंतरिक इच्छा असतांना श्रीमहाराजांनी आनंदसागर महाराजांना प्रपंच थाटण्याची आज्ञा दिली!
पत्नी, एक मुलगी, आई यांच्यासह आनंदसागर महाराजांनी जालना श्रीराम मंदीर भिक्षेवर आणि नामप्रेमाने मोठं केलं. त्यांना लोकांना अनुग्रह देऊन नामप्रसार करावा, अशी गुरूआज्ञा मिळाली होती. परंतु, त्यांनी फारच कमी लोकांना अनुग्रह दिला. कुणी अनुग्रहासाठी आला तर ते म्हणत, 'माझा अनुग्रह घेतला तर तुझ्या मुलाला वेड लागेल, तुझी पत्नी मरेल. चालेल का?' आणि फारच तयारीचा निघाला तर अनुग्रह देत नाही तर त्याला गोंदवल्याला पाठवत!
त्यांच्याकडे असा एक तयारीचा शिष्य अनुग्रहासाठी आला असता, त्यांनी त्याला स्वतः गोंदवले येथे श्रीमहाराजचरणीं आणलं आणि त्यांच्याकडून अनुग्रह देवविला. हा सत्शिष्य म्हणजे प.पु. रामानंद महाराज उर्फ पांडुरंगबुवा! आनंदसागर महाराजांनी रामानंदांना अनुग्रह दिला नाही परंतु आपली कन्या देऊन त्यांना जावई मात्र बनवलं! काय लीला असतात भगवंताच्या! अनिर्वचनीय!

कालांतरानें, १९०५ मध्यें आनंदसागरांना गोंदवल्याहून श्रीमहाराजांचं बोलावणं आलं. आणि मग बुवा २-३ महिने गोंदवले येथे सद्गुरूंच्या सेवेत राहिले...
१९०७ मध्यें आनंदसागर महाराज जालन्याहून विदर्भातील नांदुरा नावाच्या गावाला निघाले. निघतांना आईला नमस्कार केला, तर आईंना विचित्र वाटलं, त्या म्हंटल्या, 'गोविंदा, आज काय हे असं?' त्यादिवशी नांदुरा येथें आनंदसागर महाराज भजनाला बसलें, बेंबीच्या देठापासून एक अभंग गायला, "स्वामी माझा पाहिला या माणगंगातिरी". हे पद म्हणतांना तन, मन, जीव, प्राण गहिवरून गेलं होतं. भजन झाल्यावर डोळे लावून ध्यानस्थ बसलें. चंद्रग्रहण होतं. ग्रहण सुटल्यावर जवळच्या लोकांना म्हंटलें, 'मी आता जातो. बोलावणं आलं आहे. महाराज तुमचें कल्याण करतील!'
एवढं सांगून 'महाराज, राम, महाराज' हे तीन शब्द उच्चारून या आनंदाच्या सागरानें देह रामापायीं समर्पित केला....!
त्यांच्या आईंना ही बातमी समजल्यावर त्या म्हंटल्या, 'रडता काय रे मेल्यांनो! भजन करा म्हणजे त्याचा आत्मा संतुष्ट होईल!' आणि श्रीमहाराजांना ही वार्ता कळली तेंव्हा ते म्हंटले, "माझा उजवा हात गेला!"
धन्य ते सद्गुरू, धन्य ती आनंदसागराची महामाता आणि धन्य तो अनन्य भक्तीचा 'आनंदसागर'!

आजच्या या पावन पर्वकाळांत सद्गुरूंनी दिलेलं नाम घेत,
 आनंदाचा सागर नयनी पहा रे गड्यांनो! 


    ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)
!!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!!

Thursday, January 3, 2019

साधकत्वाचे नियम!


🌹🌷" नामप्रेमचिंतन " 🌹🌷

शंका- दोष जळून जाण्यासाठी अनेक साधक त्यांच्या त्यांच्या सद्गुरू आज्ञेप्रमाणे ते करतात. काही असे करणे आवश्यक आहे असे वाचण्यातही आले आहेत्यामुळे माझ्या मनात असा प्रश्न आला की आपले सद्गुरू असे काही करायला सांगून गेलेत का? त्यांनी काही नियम घालून दिलेत का? आपण यावर मार्गदर्शन करावे ही विनंती.

श्रीराम! 
     ज्याला आपले कल्याण करून घ्यायचे आहेत्याने ज्याचे जीवन कल्याणकारी आहेअशाचे पाय धरले पाहिजे. असा कल्याणकारी सत्पुरूष म्हणजे अधिकारी संत! आपले कल्याण साधण्यासाठी पहिली गोष्ट कोणती करावी लागत असेल तर,
संताचिये पायी हा माझा विश्वास ।
सर्वभावे दास झालो त्यांचा ।
      सद्गुरु देहात असतांना अनुग्रह देतेवेळी दररोज सकाळी शुचिर्भूत होऊन किमान एक माळ जपसात्विक आचरणरामनवमीहनुमानजयंतीगोकुळाष्टमी उपवासशक्य असल्यास एकादशी करावीमुख्य उत्सवास गुरुगृही दर्शन इ. नियम घालून दिले होते. हे नियम कल्याणकारी अध्यात्मसाधनेचे प्रवेशद्वार आहे.
परंतुप्रवेशद्वारापर्यंत आलो म्हणजे गाभाऱ्यात श्रीचरणी पोचलो असा नाही. आत जाण्यासाठी सद्गुरूंनी जे कठोर आणि सूक्ष्म नियम सांगितले आहेत ते अंतरंग साधनेची तपश्चर्या आहे.
     देहाने बाह्यांगाने साधना करत असताना बाह्यशत्रूंवर कदाचित विजय मिळवला तरी अंतरंग विकारांचा त्याग करणेहा मुलभूत नियम सद्गुरु खऱ्या साधकाला सांगतात. नारदभक्तिसूत्रामध्ये निर्देशित केल्याप्रमाणे अभिमान दंभादिकं त्याज्य | या सूक्ष्म नियमाचे पालन हे भक्तीच्या गाभाऱ्यात पोचण्यासाठी अनिवार्य आहे.

साधनेत एकेक पाऊल पुढे टाकत असतांना मानदंभलोकांकडून स्तुती यातून एका अभक्ताचा जन्म होतो. भगवंतापासून कधीही विभक्त न होणाऱ्या भक्तपणाचा नियम फार बारीक आहे.
ते भक्त म्हणावे एकांति । लौकिकविषयी नाही प्रीति । 
सर्वकाळ आत्मरति । तृप्त होऊनि राहिले ।।
तेचि म्हणावे मुख्य भक्त जे कधी न होती विभक्त ।
देवावेगळे कधी न होत । स्वये देव जाहले ।।
भक्त म्हणविता देव झाले । परी देवासी न विसरले ।
देवभक्तपण राखिले । आजन्म मरणांती ।।

      तमोगुणी वातावरणात वावरताना विषयापासून विभक्त राहणे हा नंतरचा टप्पा. त्याअगोदर किमान सात्त्विक वातावरणात आल्यावर तरी विषयविभक्त होऊन अनुसंधान टिकवणे महत्त्वाचे आहे. साधारणपणे १९०६ मध्ये प.पू. रामानंद महाराजांनी गोदावरी प्रदक्षिणा ठरवली. त्यावेळी सहावीत शिकत असलेला बाळ प्रल्हाद सुद्धा त्या ५०-६० सद्गुरुभक्तांमध्ये होता. या तीर्थयात्रेत सोबत एक बैलगाडी आणि दोन घोडे हे सामान ठेवण्यासाठी होते. सर्वांनी अनवाणी पायांनी चालावेस्नानाला आणि प्यायला केवळ गोदावारीचेच पाणी घ्यावे आणि नामस्मरणाशिवाय इतर गप्पा मारता येणार नाही.’ असे नियम रामानंद महाराजांनी ठरवून दिले. सर्वांनी विशेषतः बालवयी भक्त प्रल्हादाने सर्व नियमांचे पालन करून नामानुसंधानात ही प्रदक्षिणा पूर्ण केली. पर्वकाळअध्यात्मिक उत्सव इ. मध्ये विषयचिंतन पूर्ण सोडून नामाला अखंड धरावेहा नियम पू. प्रल्हाद महाराजांनी इ. सहावीत असतांना आचरून दाखविला.
     खूप जास्त व्यक्तींबरोबर – साधकांबरोबर साधनेव्यतिरिक्त चर्चा करणं - यात वेळेचा अपव्यय तर आहेच पण यातच बुद्धिभेदाचं बीज आहे. साधना ही मानसिक पातळीवर एकट्यानेच करण्याची गोष्ट आहे. या मार्गावर सद्गुरूंखेरीज आणि त्यांच्या खऱ्या सत्शिष्यांखेरीज कुणीही मार्ग दाखवण्यास समर्थ नाहीकारण इथे आत्मप्रचीतीने सांगणाराच उपयोगी पडतो. आणि जेव्हा यांना सोडून आपण भलत्याच्या पाठी लागतोतेव्हा पारमार्थिक आयुष्याचा सर्वनाश होण्यास वेळ लागत नाही. तेंव्हाप्रापंचिकच काय तर अकारणअनावश्यक पारमार्थिक चर्चेत वाटणाऱ्या रसग्रहणाचा त्याग करणेहादेखील साधकदशेतील एक नियम आहे.
विधी ते पाळितीनिषेधा ते गाळिती ।।

      रिसोडला पू. सखाजीशास्त्रींकडे वेदोपनिषदे आणि श्रीमद्भागवत ग्रंथाचा सखोल अभ्यास आणि गुरुसेवा करून त्याची परिणती अशी झाली की प्रल्हाद महाराज नामात अधिकाधिक बुडू लागले. पुराणपोथ्याअध्यात्मग्रंथ कितीही वाचले तरी शेवटी त्यातून भगवंताच्या अनुसंधानात रुपांतर झाले नाही तर ते व्यर्थ. तेंव्हासद्ग्रंथ वाचनश्रवण हे अखंड स्मरणासाठी करावेहा नियम वेदपाठशाळेत असल्यापासून  श्रींनी पाळून दाखवला. आपण उत्सवात किंवा इतर निमित्ताने जेंव्हा श्रवणकीर्तननिरुपणवाचनलेखन करतो त्यातील हा अनुसंधानाचा मुलभूत नियम आपण विसरता कामा नये. 
श्रीमहाराज म्हणत, "मी सांगतो त्यापेक्षा अधिक तरी करतातनाहीतर कमी तरी करतातमी सांगतो तेवढंच आणि तसंच कुणीच करत नाही." 
बुद्धीला खतपाणी मिळावं हा एक परमार्थाला विरोधक असा सात्त्विक रोग आहे. जी माहिती आपल्या साधनेचंनामाचं दृढीकरण करत नाहीती आपल्याला उपयोगी नाहीएवढंच लक्षात ठेवावं. 
बुद्धिभेद होईल अशा व्यक्तीगोष्टीपोस्ट्स यांपासून सावध राहणे नितांत आवश्यक आहे. आजच्या तंत्रयुगात जग लहान झालंय आणि परिणामी अनेकविध माहिती सतत आपल्या पारमार्थिक होऊ पाहणाऱ्या” मनावर आदळत राहते. हे होतं एका रोगापासून... आणि तो रोग म्हणजे अकारण अध्यात्मिक माहिती गोळा करण्याचा मोह!
    आज इंटरनेटच्या युगात अध्यात्मिक वाङमयसंतचरित्र हे केवळ अनेकानेक ठिकाणी पोस्ट करण्याचं साधन करण्यात आलं आहे. त्याचं वाचनचिंतन आणि त्यानुसार आचरण करणं याची मानसिक तयारी आणि चिकाटी दुर्दैवाने फार फार कमी दिसत आहे. 
आपले हे उपद्व्याप बघून आपल्या सद्गुरूंना काय वाटत असेल याचा विचार करून स्वतःला सुधारणं हा एक महत्त्वाचा साधकीय नियम आहे.

      १९१८ मध्ये इंफ्लूएंझाच्यासाथीने प्रल्हाद महाराजांच्या कुटुंबातील चार कर्ती माणसं देवाघरी गेली. या लौकिक दुःखाच्या क्षणी महाराजांनी आपल्या सद्गुरूंना हे मृत्यूचे तांडव थांबवाअशी विनवणी किंवा मागणी केली नाही. परमार्थसाधना ही प्रापंचिक अडचणी सोडवण्यासाठी किंवा काही लौकिक सिद्धीसाठी करायची नसून आत्मशुद्धीसाठी करायची असतेहा नियम ज्याच्या रोमारोमात होताअशा सत्पुरुषाचे शिष्य म्हणवणारे आपण किती किती लौकिकात अडकतो! नामाचा नेम हा सकाम व्यवहार न करता रामप्रेमासाठी करावाहा नियम आपण पाळला तरच भक्तीला तेज येईल. नाहीतरनाम घेतल्यामुळे आमच्या घरातील रुग्ण आजारमुक्त झालाएखाद्याला नोकरी लागलीएखाद्याचे लग्न ठरलेअचानक कुणीतरी आर्थिक समस्या सोडवण्यासाठी धावून आलेही गुरुकृपा समजणेहे गुरुकृपेचे अवमूल्यन केल्यासारखे होईल.
विषय तो त्यांचा झाला नारायण ।।
जर रामपदी रती हवी असेलतर या शाश्वत पंथावर चालताना नश्वर गोष्टींचा आधार घेऊन चालता येणार नाही. देहाने अर्थातच प्रपंचासाठी प्रयत्न करावे लागतीलचपरंतु हे करत असताना मनातून मात्र केवळ राम चरणांचं ध्यान असणं आणि त्यासाठी आजूबाजूच्या वस्तूव्यक्ती यातली आसक्तीममत्त्व कमी होणं हे अपेक्षित आहे. नामाने हे साधणार नाही काअसा प्रश्न विचारला जातो. नामाने सर्व साधतं हे त्रिवार सत्य आहेपरंतुआपली तशी इच्छा असेल तर! नाहीतर साधनेचं देखील आसक्ती वाढवण्यातच पर्यवसान होतं हा धोक्याचा इशारा लक्षात ठेवावा. तेंव्हासद्गुरूंनी आचरणातून घालून दिलेला आणखी एक महत्त्वाचा नियम म्हणजे नश्वर गोष्टींची आसक्ती कमी करणं!

      साधनेतील अनुभव हे मैलाचे दगड आहेतअसं श्रीमहाराज म्हणत आणि जेव्हा विचारलं तुम्हाला काय अनुभव आलेतेव्हा म्हणालेमला कोणतेही अनुभव आले नाहीतफक्त अखंड समाधानाचा अनुभव आला. हे फार महत्त्वाचं आहे. सर्व लौकिक विकारवासना तशाच राहून केवळ नामाच्या शक्तीने आलेल्या भौतिक अनुभवांना फारसं महत्त्व नाही. अंतरंग परिवर्तन होणं हाच अनुभव महत्त्वाचा आणि त्याची परिणती म्हणजे शांती – आनंद – समाधान!

साधकदशेत दुसऱ्याच्या साधनेतील अनुभव ऐकण्यासाठी नको तितकं आसुसलेलं राहणं आणि मग तुलना करून आपल्या साधनेच्या श्रद्धेला तडा जाऊ देणंहे आजच्या काळात अनेक ठिकाणी बघायला मिळाले आहे. आपल्या साधनेला बळकटी आणण्यासाठी उत्तम साधकांचे साधन कसे आहे हे समजून त्यानुसार आचरण करणे हिताचे आहे हे खरे. परंतु त्यांच्या अनुभवांवरून आपली साधनेची पातळी जोखणे या गोष्टी घातक आहेत. त्यामुळे आपल्या साधनेवरच्या श्रद्धेला तडा जातो आणि पुढे मार्ग चालत असलेला साधक दोन पावलं पुढे चालून दहा पावलं मागे येतो. 
त्यातही दुसऱ्यांना उगीच आपले अनुभव ऐकवत राहणंही साधकांसाठी त्याज्य बाब आहे. श्रीमहाराजांनी साधनात गुप्तता पाळावी हे यासाठीच सांगितले आहे. एक तर आपले अनुभव सांगण्याने आपण कुणीतरी मोठे असा अहंकार नकळत आपल्या मनात येतोआणि दुसरे म्हणजे ज्याला आपण सांगतोत्याच्या साधनेवर अनेकदा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. तेंव्हाअनुभवांच्या मागे पळण्यापेक्षा सूक्ष्म आत्मप्रचितीसाठी निष्काम साधना करणेहा एक महत्त्वाचा नियम आहे.
     
      गुरुकृपेचा खरा अनुभव येण्यासाठी देहाने अनुसरण केलं पाहिजे हे तर खरंचपरंतु काही साधनेतील अलिखित परंतु अतिशय महत्त्वाचे नियम पाळणं गरजेचं आहे. यातल्या साधक-बाधक गोष्टी आपण बघितल्या. त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल तर ती म्हणजेनाम आणि उपासना काहीही” झालं तरी न चुकवणं. आपण स्वतःलाच विचारावंगेल्या काही वर्षांत जर आपण नामाला लागलेले असूतर या दिवसात किती वेळा आपण रोजचं नाम चुकवलं आणि त्याचं कारण काय होतंबहुतेक वेळा अतिशय क्षुल्लक कारणापायी नाम चुकलं हे लक्षात येईल. अजून एक विपर्यास म्हणजे घरात शुभकार्य असो वा अशुभ घटनादोन्हीत आपलं नाम टिकतं का याचा विचार व्हावा. टिकत नाही हे सत्य आहे. यावेळेत इतर लौकिक गोष्टी थांबतात कातर नाही. नाम थांबतंकारण लौकिक गोष्टींची किंमत नामापेक्षा अनंतपट अधिक आहे अजूनही! 

    अशी आत्मवंचना होऊ नयें यासाठीच संख्येच्या नियमाचं बंधन साधकाला असावं! नामालय उपक्रम संख्येला आणि त्यात उत्तरोत्तर प्रगती होण्याला महत्त्व देण्याचं कारण म्हणजे अगोदर देहाला नामाची सवय लागावी. परंतुयाचबरोबर प्रत्येक साधकाने अखंड सावधानता बाळगून लौकिक अपेक्षामानदंभ यांना संपवण्याचा विवेकयुक्त प्रयत्न करणे अनिवार्य आहे.

      १९२० साली जालन्याला श्रीरामनवमीच्या उत्सवात पू. रामानंद महाराजांनी सद्गुरु श्री ब्रम्हचैतन्य महाराजांकडून आलेले श्रीरामपंचायतन निष्ठापूर्वक रामसेवेचा महाप्रसाद म्हणून प्रल्हादबुवांच्या स्वाधीन केले. रामरायाची नित्यनियमाने अर्चनोपासना करावीतीर्थ घेतल्याशिवाय पाणीदेखील प्यायचे नाही. साधनद्वादशी इ. नियम सांगितले. त्याचे श्रद्धापूर्वक पालन प्रल्हाद महाराजांनी शेवट पर्यंत केले. 
पुढे हेच श्रीरामपंचायतन हरवल्यावर सात दिवस अन्नपाणी ग्रहण न करता रामशोधार्थ भोगलेला त्रास आपणा सर्वांना ठाऊकच आहे. रामराया सापडल्यावर झालेला उत्सव आणि सद्गुरूंनी सांगितलेल्या नियमांचे कठोरपणे परंतु प्रेमपूर्वक पालन करणेहाच शिष्याचा धर्म आहेहा आदर्श पू. प्रल्हाद महाराजांनी आचरणातून दाखवून दिला.

   तेंव्हाआपल्या सद्गुरूंना अपेक्षित साधना दंभासक्ती सोडून निरहंकारी वृत्तीनेआत्मीयतेने करणे हे ज्याला साधलेत्याला गुरुकृपा काय आहे याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही!
रामरायाच्या प्रेरणेने या चिंतनाच्या माध्यमातून बघितलेले साधनेचे नियम कसोशीने पालन करूयातजेणेकरून हा मनुष्यजन्म सार्थकी लागेल! 

!!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!!