Friday, March 23, 2018

भरत : भक्तीयुक्त प्रपंच म्हणजे खरा परमार्थ


 🌹🌷" नामप्रेमचिंतन " 🌹🌷

!!! रामायण !!! 
भरत : भक्तीयुक्त प्रपंच म्हणजे खरा परमार्थ

श्रीराम! 
कालच्या चिंतनात आपण बघितले की शत्रुघ्न हा अर्थस्वरूप, लक्ष्मण हा धर्मस्वरूप, श्रीराम मोक्षस्वरूप आणि भरत हा कामस्वरूप आहे. यामध्ये भरताला कामस्वरूप म्हटले आहे. परंतु, भरताचा काम हा तुमच्याआमच्यासारखा विकारी नसून विकाररहित आहे. तमोगुणी वृत्तीतून आलेला काम हा त्याज्य आहे. परंतु, भक्तिमार्गाचे आचार्य नारदमहर्षी यांनी भक्तीची व्याख्या करतांना यथा व्रजगोपिकानाम् || अशी केली आहे. गोपिकांनी आपला काम भगवंताशी जोडला. लौकिक अर्थाने गोपिकांमध्ये श्रीकृष्णाप्रती काम होता, परंतु तो त्यांनी प्रत्यक्ष भगवंताशी आणि पूर्णपणे जोडला. श्रीमहाराज म्हणत, “गोपींनी कृष्णाला सर्वस्व अर्पण केले आणि त्यांच्या भाग्याने तो देव निघाला!त्रेतायुगात श्रीराम हा परमार्थअवतार झाला; तर भरत हा प्रेमावतार झाला.

रामावतारांत भगवंत अनेक साधूमुनींना भेटलेजेंव्हा ते भरद्वाज मुनींच्या आश्रमामध्यें आलेतेंव्हा मुनी म्हंटले, "आज माझी सर्व साधनासगळे पुण्य सफल झालें म्हणून रामचंद्राचें दर्शन झालें." कालांतरानें भरत हे चित्रकुटावर रामदर्शनासाठी जातांना भरद्वाज मुनींच्या आश्रमांत येतातमुनी भरताला 'साधू (सत्पुरूष)' ही उपमा देऊन म्हंटले, "माझ्या संपूर्ण जपतपाचें फल आहे रामदर्शनपरंतुरामदर्शनाचें फल काय ते आज मला भरत दर्शनानें कळालेंरामदर्शनाचें फल भरतदर्शन (संतसंगआहेमला पुण्यानें अवतारी रामाच्या बहिरंग स्वरूपाचे दर्शन झालेंपरंतु रामाचें अंतरंगजे प्रेमदर्शन आहेहे मला भरतदर्शनानें झालें." भरताची रामभक्तीत्यागसंयमव्रतवैराग्य अद्वितीय आणि स्तुत्य तर आहेच पण अनुकरणीय आहे"भरत धर्माप्रमाणें वागतों असें म्हणणें म्हणजे भरताला कमीपणा येईलभरत वागतो तोच धर्म असतोइतके त्याचे व धर्माचे नाते अभिन्न आहे." हे वसिष्ठ मुनिंनी दिलेले प्रमाणपत्र आहे. या धर्माचरणाचे अधिष्ठान रामप्रेम आणि रामप्रेमातून आलेला पूर्ण शरणागत भाव आहे.

पादसेवन अर्थात गुरूसेवा कशी करावी याचा माझ्या ह्रदयांत साठवलेला आदर्श म्हणजे भरत! भरत आपल्या सद्गुरूंना म्हणजे रामरायाला अयोध्येच्या सिंहासनावर बसवण्यासाठी चित्रकुटावर घ्यायला आला... परंतुरामरायानें पुरूषोत्तम मर्यादा सांगितल्यावर चित्रकुटाहून भरत निघण्याची वेळ आली तेंव्हा त्यानें राघवाच्या चरणपादुका मागितल्या. रामरायानें त्या दिल्यावर भरताला विश्वास झाला की आज पादुका मिळाल्या म्हणजे एक ना एक दिवस पदसुद्धां माझ्याकडे येतील! जिथे पादुका तिथे चरण चालत येतील! आणि या विश्वासानेंच भरतानें पादुकांना सत्तास्थानी ठेवून जो राज्यकारभार चालवला तो राम सदेह उपस्थित नसतांना देखील रामराज्य झालं! भरतानें श्रीचरणी विश्वास ठेवून केलेला अयोध्येचा प्रपंच हाच आदर्श परमार्थ!

लौकिक जीवनात श्वास जेवढा अनिवार्य आहेपारमार्थिक जीवनात विश्वास तेवढाच अनिवार्य आहे! सद्गुरूचरणी विश्वास ठेवून त्यांना आवडेल तसें कर्म करावेंतीच श्रेष्ठ पादसेवन भक्ती ठरेल! कर्मभक्तीज्ञानयोग सर्व काही गुरूपदी रत झालेल्या भक्ताच्या चरणी अनायासे येतं! आपल्या गुरूतुल्य भावाच्या पादुकांना साक्षी ठेवून भक्तीसह निष्काम भावनेनें गृहस्थाश्रम उत्तम प्रकारे चालवण्याचे मुर्तीमंत उदाहरण इतरत्र मिळणे अशक्य आहेआपण आपल्या घरांत सुद्धा सद्गुरू पादुका ठेवल्या आहेत परंतु त्यांच्या सत्तेनें प्रपंच करीत नाहीम्हणून घरांत रामराज्य नाहींरामाच्या नावानें प्रपंच करणे ही खरी रामनवमी आहेआपण त्यापासून काही बोध घ्यायला नको कारामरायानें आपल्या देहाचा सहवास अनेकांना दिला. परंतुआपल्या चरणपादुका केवळ एकाच भक्ताच्या मस्तकावर दिल्या. तो भक्त म्हणजे भरत! भरताला जे रामप्रेम मिळालं ते आपल्याला मिळावं असं वाटत असेल तर पाय सेवावे सेवावे । सद्गुरूंचे प्रेम भावें ।

।। श्रीसद्गुरू सीतारामचरणार्पणमस्तु ।।


        ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

   !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

Thursday, March 22, 2018

श्रीरामाचा दासानुदास: श्रीशत्रुघ्न

 🌹🌷" नामप्रेमचिंतन " 🌹🌷


रामायण ! 

श्रीरामाचा दासानुदासश्रीशत्रुघ्न

श्रीराम!
वाल्मिकिरामायणात शत्रुघ्नाला सुद्धां भगवान विष्णूंचाच अंशावतार मानले आहेशत्रुघ्न हा शांतमितभाषीतेजस्वी आणि पराक्रमी होताज्याच्या केवळ स्मरणाने शत्रूचा पूर्णपणे विनाश होतो आणि जो इतका विद्वान आहे की सर्व वेदांचा प्रकाश ज्याच्यात दिसून येतो : शत्रुघ्न!
जाके सुमरन ते रीपुनासा |
नाम सत्रुहन वेद प्रकासा ||

रामावतारामध्ये दशरथ महाराज हे वेदस्वरूप आहेततर त्यांचे चार पुत्र हे चार पुरुषार्थ आहेत. लक्ष्मण धर्मशत्रुघ्न अर्थभरत काम तर श्रीराम साक्षात मोक्ष आहेत.

शत्रुघ्न हा दशरथ आणि सुमित्रेचा मुलगा. लक्ष्मणाचा जुळा भाऊ, राम आणि भरताचा सावत्रभाऊ आणि चार भावंडांमधला सर्वात धाकटा (जुळा असुनही). पण शत्रुघ्नाची खरी ओळख याहुनही खुप मोठी आहे.

शत्रुघ्नाचे चरित्र तसे फार प्रचलित झाले नाही. अर्थ जर जास्त प्रगट झाला तर अनर्थ होतो. त्यामुळेअर्थस्वरूप शत्रुघ्न हा मौनी आहेमौनभावाने सेवेत राहणे यातच अर्थाची शोभा आणि सार्थकता आहे. श्रीराम सेवेत जसा लक्ष्मण तसा भरताच्या सेवेत शत्रुघ्न होता. मंथरेमुळे माझ्या पित्यासमान थोरल्या भावाला वनवासात जावे लागलेहे समजल्यावर शांतवृत्तीचा शत्रुघ्न क्रोधावतार बनला. मंथरेचे केस धरून तिला फरफटत ओढत बाहेर आणले आणि लातांच्या प्रहाराने तिला जखमी केले. शेवटी भरताने त्याला शांत केले. रामरायावर नितांत प्रेम करणाऱ्या शत्रुघ्नाची रामनिष्ठा अशाप्रकारे अनेकदा दिसून आली. लंकाविजयानंतर अयोध्या शृंगारण्याची व श्रीराम स्वागताची उत्तम व्यवस्था शत्रुघ्नानेंच केली होती. १४ वर्षाच्या काळात अयोध्या कधी नव्हे इतकी सजली, नटली, बहरली, समृद्ध झाली. याचे श्रेय सर्वांच्या अनुपस्थितीत राज्य योग्यप्रकारे सांभाळणार्‍या शत्रुघ्नाकडेच जाते.

लक्ष्मणाने जी सेवा रामाची केली तशीच शत्रुघ्नाने भरताची केली. लक्ष्मण रामाची सावली बनुन राहिला तर शत्रुघ्न भरताचे प्रतिरुप बनुन. दोन्ही जुळ्या भावंडांनी निरपेक्षपणे आपल्या सावत्र भावांची सेवा करण्यात धन्यता मानली.

कालांतराने लवणासूर राक्षसाचा निःपात करण्यासाठी भरताला पाठवण्याचा विचार असतांना शत्रुघ्न उठून म्हंटला, "माझ्यासारखा दास असतांना ह्यांना श्रम करू देता कामा नयें." ते मान्य करून श्रीराम म्हंटले, "बंधोअसेच होवोतू लवणासूराचा वध केल्यावर तु तेथे धर्मपूर्वक राज्यशासन चालवावें!" हे ऐकून शत्रुघ्न हळू आवाजात म्हंटलातस्यैवं मे दुरुक्तस्य दुर्गतिः पुरुषर्षभ ॥ "राजनज्येष्ठ बंधू भरत असतांना कनिष्ठाचा राज्याभिषेक मला अधर्म वाटतोपूजनिय बंधोमला राज्याभिषेकरूपी दुर्गती नको आहे!" किती सुंदर त्याग आहेश्रीरामाच्या वियोगात राज्यप्राप्तीला तो दुर्गती मानतोतरी केवळ श्रीरामाची आज्ञा म्हणून शत्रुघ्न युद्धाला सज्ज झाला. युद्धात निपुण असणाऱ्या शत्रुघ्नाला रामरायाने स्वतः युद्धनीती सांगितली.
एवं भवतु काकुत्स्थ क्रियतां मम शासनम् ।
राज्ये त्वामभिषेक्ष्यामि मधोस्तु नगरे शुभे ।

चार हजार घोडेदोन हजार रथशंभर हत्तीदहा लाख सुवर्णमुद्रा अशा लवाजम्यासह शत्रुघ्नाला श्रीरामाने पाठवले. लवणासूर वधानंतर मधुरापुर नगरी वसवून राज्य चालवलेत्यानंतर रामरायाने आपल्या भावाचा राज्याभिषेक करून क्षात्रधर्म आणि प्रजापालन याचे सुंदर उद्बोधन केले. यमुना नदीच्या काठावर वसवलेल्या या नगरीला'वेद निर्मिताम्म्हटले जाते. नगरं यमुनाजुष्टं तथा जनपदान् शुभान् ।  हीच नगरी द्वापारयुगात भगवंताच्या पुढील अवतारामुळे मथुरा म्हणून प्रसिद्ध झाली. रामायणात मथुरेच्या सुखसमृद्धीचे वर्णन आहे. अर्धचन्द्रप्रतीकाशा यमुनातीरशोभिता ।  बारा वर्षे मथुरेत राज्य करून अयोध्येला परत जातांना शत्रुघ्न वाल्मिकी आश्रमात आला होता. त्यावेळी कृतकृत्य झालेले वाल्मिकी ऋषी म्हटलेशत्रुघ्न! माझ्या हृदयातही तुझ्याबद्दल खूप प्रेम आहे. म्हणून मी तुझ्या मस्तकाचे अवघ्राण करीन हीच प्रेमाची पराकाष्ठा आहे.” आणि त्यानंतर मुनींनी रामचरित्राचे गायन करून शत्रुघ्नाला राममहिमा सांगितला.

शेवटी जेंव्हा श्रीराम परमधामाला जायला निघालेत्यावेळी शत्रुघ्न परत येऊन सद्गदित स्वरात भगवंताला म्हटला, "रघुनाथामाझ्या दोन्ही पुत्रांना राज्य सोपवून मी आपल्या बरोबर येण्याचा निश्चय करून आलेलो आहेआपण आता मला दुसरी कोणतीही आज्ञा करू नयें! " भगवान श्रीरामाने शत्रुघ्नाची विनंती ऐकली व शत्रुघ्न सुद्धां भगवंताबरोबर परमधामाकडे निघून गेलाउदात्ततेचे प्रतीक श्रीरामबंधुप्रेमाचा आदर्श लक्ष्मणत्यागाचा आदर्श भरत तर निरपेक्ष आणि नि:स्पृह वृत्तीचे प्रतिक शत्रुघ्न हा होयशत्रुघ्नाचे संपूर्ण जीवन हे समर्पणाचे होते. समर्पण हे शांत असतेते बोलून दाखवले जात नाही. अशा निष्कामनिरपेक्ष शांत समर्पणाचा आदर्श असलेल्या शत्रुघ्नाला आपल्या जीवनाचा आदर्श बनवून तसे आचरण केल्यास आपल्यातील सर्व विषयविकार या आत्मारामाच्या शत्रूंचा निःपात होऊन आपल्यातील शत्रुघ्न प्रगट होईलयात शंकाच नाही!

जानकी जीवन स्मरण जय जय राम



Wednesday, March 21, 2018

निर्विकल्प आणि दृढ भक्तीचा आदर्श: शबरी


 🌹🌷" नामप्रेमचिंतन " 🌹🌷



निर्विकल्प आणि दृढ भक्तीचा आदर्शशबरी

श्रीराम!
तुमच्या साधनेनं तुम्हाला आत्मज्ञान होईलतुमच्या तपश्चर्येनं तुम्हाला भगवंताचं दर्शन होईल. परंतुया सर्वांच्याही वर असलेलं भगवंताचं प्रेम जर हवं असेल तर तुमच्यासुद्धां तेवढ्या ताकदीचं प्रेम असावं लागतं! आणि तेच सुदामाजवळ होतं. अशा भक्ताच्या पुढे जगच काय तर जगाचा नियंता भगवंतसुद्धा दास्यत्व पत्करतो! मै तो भगतनको दास। भगत मेरे मुगुटमणी।।

जसे भगवंताचें अनेक अवतार होऊन गेले तसे भगवंताच्या प्रेमाचें अनेक अवतार आहेत...
किंबहुनाभगवंतानें एकावेळी एकच अवतार घेतलापरंतु त्याच्या प्रेमानें एकाच वेळी अनेक अवतार घेतलेले दिसतात. जो सुदामारुपानें प्रेमाचा अविष्कार झाला आणि त्या प्रेमाचं प्रतिक मुठभर पोहे बनलेतोच अविष्कार अगोदर रामावतारात झाला होता. आणि तो म्हणजे "शबरी"!
शबरी अविष्कारात प्रेमाचं प्रतिक मुठभर पोहे नव्हतेंतर उष्टी बोरं होती... शबरी अविष्कारात रामाला प्रेमासाठी चालत यावं लागलं तर सुदामा अविष्कारात प्रेमाला कान्हाकडे चालत यावं लागलं.... या दोन्ही प्रेमामध्ये त्यागाची बैठक होती, हे विशेषत्वानें बघितलं पाहिजे....

मतंग ऋषींच्या आश्रमापासून कांही कोसांच्या अंतरावर एका भिल्ल राजाचें राज्य होतेंराज्य लहानसेंच होतेंभिल्लांचा राजाशबरजरी रानटी होतातरी तोहि ऋषींच्या आचरणाने व उपदेशाने थोडा सुधारला होताया भिल्ल राजास एक पांचसहा वर्षांची मुलगी होतीशबरीउभयतां मातापितरांनी मुलीला आश्रमांत पाठविण्याचा निश्चय केलामतंग ऋषींच्या प्रभावानें आणि अनन्य गुरुसेवेमुळे शबरी सिद्ध तापसी बनलीकालांतरानेऋषीमुनींच्या संकेतानुसार भगवंताच्या भेटीची या साध्वीच्या मनात तळमळ आणि उत्कंठा वाढत राहिलीआश्रमात या कधी रे येशील। रामा रघुनंदनारामा रघुनंदना॥ यातून तिच्या वाट पाहण्याची आर्तता दिसतें.

श्रीराम आणि लक्ष्मण या तापसीच्या आश्रमांत आल्यावर तीने प्रेमाश्रुंनी भगवंताचे पादप्रक्षालन केलें. "हे पुरुषोत्तमाया महापुण्यदायक आश्रमांत तुझें दर्शन झाल्यानें मी कृतकृत्य झालें आहेआणि आता मला प्रसादरूप अक्षयलोक प्राप्त होणार आहे", असें म्हणून शबरीने भक्तीभावानें रामरायाला व लक्ष्मणाला पंपा तिरावरील बोरे खायला दिलीबोरांवरील व्रण पक्षांच्या चोचीमुळे नाहीतआपल्यापुढे फक्त गोड फळे ठेवण्यासाठी मी चाखल्याने पडलेले ते व्रण आहेतही बोरे उष्टी नाहीत तर अभिमंत्रीत आहेत त्यामुळे तू साशंक नजरेने बघू नकोस असंही शबरी सौमित्राला सांगतेपरंतुकेवळ श्रीरामच उष्टी बोरेसुद्धा आवडीने खातोकारण त्यात प्रेम आहेनिर्लेप भाव आहेरामचंद्र शबरीच्या आश्रमात आलेतेव्हा रावणाने सीतेचं हरण केलेलं होतंशबरीने रामाला दक्षिण दिशेला जायला सांगितलंतिथे सुग्रीव आणि हनुमंताची मदत घेण्याचीही सूचना केलीरामानेही शबरीचा सल्ला ऐकला आणि त्यामुळेच पुढे सीतेचा शोध लागलायावरून शबरीला जंगलाची किती माहिती होती हे लक्षात येतंचपरंतु प्रभू रामचंद्रांचाही तिच्यावर किती विश्वास होतायाची जाणीव होतेशबरीचं मोठेपण यातच आहे.

ज्या भगवद्प्रेमासाठी सुदामानें भुकेनें तडफडत असतांना मिळालेल्या अन्नाचा त्याग केला; त्याच भगवद्प्रेमासाठी शबरी राजकन्या असून तीनें राजसुखाचा त्याग केला आणि नामप्रेमाने भगवंताला आपलासा करून घेतला!  'प्रेमाला मोल ना जगामाजीम्हणत असतांना हे प्रेम त्यागमुलक आहेहे ध्यानांत घ्यावं!

शबरीला शबरीपण उगीच आलं नाही! तिच्यात रामभेटीची तळमळ होतीपरंतु त्याचबरोबर प्रयत्नशुन्यता होती! तुम्ही म्हणालमग तीचं आश्रम स्वच्छ करून ठेवणंफुलांच्या पायघड्या घालणंनिवडून बोरं आणणं हे प्रयत्न नव्हतें का?
तरते रामभेटीचे प्रयत्न नव्हतेंते रामस्मरणाचं प्रेम होतं! ते प्रयत्न असते तर तिला त्या प्रयत्नाचा शीण आला असता. ती निस्वार्थ प्रेमापोटी ते करत होती. 'तुला जेंव्हा यायचं तेंव्हा ये! मी तयार आहेतुला बोरं भरवण्यासाठी!अशी विलक्षण प्रयत्नशुन्यता असल्यामुळें रामालाच राहवलं नाही आणि तो धावत स्वतः तिच्याकडे आला!

एका वन्य जातीतील स्त्रीने तपश्चर्येनें आणि निर्विकल्प भक्तीनें केवढा अधिकार प्राप्त करून घेतला होतातो अधिकार आपल्याला सद्गुरूंकडून मिळालेल्या सिद्धमंत्राने मिळू शकतोपण शबरीसारखी दृढ भक्ती असायला हवी!तेंव्हाशबरीमातेचा आदर्श ठेवून आपली तळमळ आणि प्रयत्नशुन्यता वाढवावी आणि देहाने कर्तव्य करत असतांना मनाने 'नामासाठी नामघ्यावेंमग त्या नामांतच राम दिसेल!


        ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

   !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏